Ad will apear here
Next
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन..
मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत.

महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.

शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल, असा दावा करण्यात येतोय. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं उचललेलं पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय.

गट स्थापन केल्याने काय होईल?

महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट असतं. शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे ८४ आणि अपक्ष ४ असे ८८ जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं.

त्यामुळे प्रत्यक्ष महापौर निवडीवेळी दगाफटका झाला तर संबंधित नगरसेवकाचं निलंबन होऊ शकतं.

त्यामुळे महापौर निवडीच्या दृष्टीने शिवसेनेने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत

राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये कोंडी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने ते दिल्लीत असतील. मात्र याठिकाणी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची ते भेट घेणार असल्याचं समजतंय.

भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVTEAZ
Similar Posts
महापालिकेतील घोटाळ्यांची पोलखोल करणार - किरीट सोमय्या मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवरुन सातत्याने शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका’ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे
राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण करण्याचे आम्ही 'त्यांच्या'कडून शिकतोय संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल मुंबई: मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या आखाड्यासाठी सध्या चांगलेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. परंतु, आता शिवसेनेच्या पालिकेतील जागा जास्त असल्याने सेना आक्रमक झाली असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सत्तेसाठी लोटांगण घालण्याचा आरोप केला आहे
रिपब्लिकनला २५ जागा; भाजप-मित्रपक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटला! मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. भाजपने मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. भाजप १९५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष
उद्धवसाहेबांच्या भाषणात बाळासाहेबांसारखे तेज; सोशल मीडियावर प्रतिक्रिया... मराठीजनांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात अंगार जागृत करणारा हाच ‘बाळासाहेबांचा आवाज’ काल, गुरुवारी गोरेगावमधील मेळाव्यात घुमला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून उपस्थितांनी तो अनुभवला. ‘बाळासाहेब परत या’ म्हणणारे आता ‘बाळासाहेब परत आले’ असे म्हणू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या आवेशपूर्ण भाषणानंतर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language